चोपडा – चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने चोपडा येथील तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन 20 सप्टेंबर 2022 रोजी देण्यात आले. चोपडे तालुक्यात झालेली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कापसाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडावरील कैऱ्या कापूस सर्व सडक्या अवस्थेत आहेत. मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग सर्व पिके नष्ट झाली आहेत. शेतकरी अत्यंत उदासीन अवस्थेत बिकट परिस्थितीत जीवन कन्ठत आहे. शेतकऱ्यांना आधार देणे हे अत्यंत जरुरीचे आहे. त्यासाठी तातडीने शेतीचे पंचनामे करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे व अत्यंत जलद गतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेस नेते एड. संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाने निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांच्यावतीने नायब तहसीलदार सचिन बाबळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के. डी. चौधरी तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप निंबा पाटील, चोपडा शहर काँग्रेस उपाध्यक्ष एड. एस .डी. पाटील व उपस्थित शेतकरी व कार्यकर्ते यांनी आग्रह पूर्वक मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे व पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. त्वरित मदत उपलब्ध न केल्यास चोपडा शहर व काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मागणीसाठी एड. संदीप सुरेश पाटील, के .डी. चौधरी प्रा. प्रदीप पाटील, अशोक साळुंखे, शशिकांत साळुंखे, सुनील बोरसे, धनंजय पाटील ,जगतराव बोरसे, कांतीलाल पाटील, प्रा. झिशान सय्यद अल्पसंख्यांक अध्यक्ष, संदीप बोरसे, नंदलाल शिंदे, प्रदेश एन. एस. यु.आय. सचिव श्री चेतन बाविस्कर, घनश्याम पाटील ,मधुकर विठ्ठल बाविस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी ,घनश्याम पाटील, गोपाल नायदे ,राहुल पाटील, समाधान कावीरे, कुणाल पारधी, इलियास पटेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन बाबळे साहेब यांनी त्वरेने वरिष्ठांना कळवीत असून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.