जळगाव (प्रतिनिधी) – येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालात महाराष्ट्रातील किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानाचे वाणिज्य मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी चारुदत्त गोखले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. व्याख्याते देवदत्त गोखले यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन दुर्ग गडकिल्ले आजही आपल्याला का आकर्षित करतात तसेच शिवाजी महाराजांनी हे किल्ले बांधताना कोणकोणते अभिनव प्रयोग केले यांचे उदाहरणासह स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना करून दिले यासोबतच शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापन तसेच किल्ल्यांचे संरक्षण तसेच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये किल्ल्यांचे योगदान, छत्रपती शिवाजींच्या व्यापार धोरणाबद्दल तसेच आर्थिक कामकाजाबद्दल तसेच किल्ले संस्कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आगामी काळात काय शिकावयास मिळेल याबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य करुणा सपकाळे होत्या तर पर्यवेक्षक राजेंद्र ठाकरे, वाणिज्य मंडळ प्रमुख प्रा. प्रवीण महाजन, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, कला शाखा समन्वयक उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक स्वाती बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाणिज्य मंडळ सदस्य प्रा. गौरी अत्तरदे, प्रा. अर्चना जाधव, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.निवेदिता जोशी,प्रा.ललिता इलको, प्रा.योगेश धनगर, प्रा.संदीप गव्हाळे, यांनी कार्यक्रम यशस्वीत्यासाठी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी यांनी केले.