यावल प्रतिनिधी (रवींद्र आढळे) – यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर असून ग्रामपंचायत च्या वसुली निधी मधून गावातील अपंग बांधवाना अद्यापपर्यन्त अपंगना कोणताच लाभ दिला गेला नाही.
सन 2021 ते 2022 मध्ये अपंग बांधवांच्या सतत मागणी व पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायत ठरावाने अपंगसाठी सभागृह सर्वानुमते मंजूर करण्यात आला तो बांधकाम कॉन्ट्रॅक्ट भाग्यश्री महेश पाटील यांना एकूण बांधकामासाठी दिला.
चार लाख अळोतीस हजार रुपये मध्ये सर्व स्टाईल खिडकी बांधकाम संडाससह देण्यात आला परंतु सभागृहाचे काम 50 %च झाले आहे आणि ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी संबधित ठेकेदार शी संगणमत करून कोणत्याही सदस्याला विषश्वासात न घेता परस्पर चेक द्वारे पेमेंड करण्यात आले आहे.
दिलेले चेक कोणत्या तारखेला व किती रुपयाचा दिला चेक नंबर सह ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावाचे आवडते सामाजिक कार्यकर्ते जुम्मा रशीद तडवी यांनी डिटेल दिले आहे त्यांनी 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना टपाला द्वारे पत्र व्यवहार केला आहे असे त्यांनी सांगितले पुढे जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी हे काय कार्यवाही करतील असे सर्व ग्रामस्थ मध्ये चर्चा चालू असून सर्वांचे लक्ष काय कार्यवाही होईल की नाही याकडे लागले आहे.
सरपंच नवाज तडवी ग्रामसेवक शांताराम तिडके, व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होईल का अशी असं धरून आहे कामात कसूर केलेल्या अधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी गावातील नागरिकांची मागणी आहे.