जळगाव – शिवाजीनगर परिसरातील दूध फेडरेशन येथील मिथिला अपार्टमेंटमधील काही मुलांनी कांताई बंधारा परिसरातील नागाई जोगाई मंदिराजवळ रविवारी ट्रीप काढण्यात आली होती यावेळी एकाचे पाय घसरल्यामुळे त्याचा पाणीत तोल गेला त्यावेळी त्याला वाचवण्यात चार मुलं पाण्यात वाहून जात होती त्यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आले तर नयन निंबाळकर यांच्या शोध अद्यापही सुरू आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.