Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन हिल्सवर आचार्यांचा जय नामाचा जयजयकार; भक्तिगीतांमुळे भक्तिमय वातावरण

by Divya Jalgaon Team
September 9, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जैन हिल्सवर आचार्यांचा जय नामाचा जयजयकार; भक्तिगीतांमुळे भक्तिमय वातावरण

जळगाव  – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सव जैन हिल्स येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी पारंपारिक वेशभूषेत श्रावक-श्राविकांच्या मधुर भक्तिगीतांसह पूज्य आचार्य जयमलजी म. सा. यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला. प्रवचन, मंगलाचरण, स्वागतगीत, भक्तिसंगीत, महामांगलिकने आचार्य जयमलजी म.सा. यांचे स्मरण करत गुरूगायनाने भव्यातिभव्य तिनदिवसीय जन्मोत्सवाचा समारोप झाला.

एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवाप्रसंगी जळगाव संघपती दलिचंदजी जैन, अ.भा. श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अशोक जैन, नयनताराजी बाफना, कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अजित जैन, अजय ललवाणी, नवरतन बोखाडीया, गौतमचंद कोठारी, जळगावनगरीच्या महापौर जयश्री महाजन, सुशिल बाफना, कांतीलाल कोठारी, सुरेंद्र लुंकड, विजय चोरडिया, विजयराज कोटेचा, अजय राखेचा यांच्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, चेन्नई, सिकंदराबाद, मारवाड रायचूर, गुवाहटी, नागोर, जोधपूर, अमरावती, बडनेरा, बोलाराम, म्हैसूर, बेंगलुरू, इरोड, इलकल, इंदौर, सुरत, अहमदाबाद, मारवाड पाली, ब्यावर, सेलम, तिरूतन्नी, गंगावती, तिरूवल्लूर सह संपूर्ण भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन, अंहिसा रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प. पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म. सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा श्री. निधीजीसह ठाणा 6 हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत पूज्य श्री. जयमलजी म.सा. यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य प्रवचनामध्ये तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म. सा. यांनी भगवान महावीर यांच्या मार्गावर चालण्यासाठी वीर कुणाला म्हणावे हे सांगितले. कोणतेही कठिणातील कठिण कार्य सहज सोपे करण्यासाठी विरता महत्त्वाची आहे. संकल्प महत्वाचा असून घेतलेल्या संकल्पावर कृतिशीलपणे आचरण करणे तसे जगणे महत्त्वाचे आहे यासाठी आचार्य पूज्य श्री.जयमलजी म.सा. याचे जीवनकार्य अभ्यासणे त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात संस्कारित करणे म्हणजे आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होणे होय. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी अनेक यशाची मंत्रे शिकविणारी पुस्तके, व्याख्याने आहे. ती अभ्यासणेही महत्वाचे आहे, मात्र आपल्या आचार्यांच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले तर त्यांनी संघर्ष काळातही समयसूचकतेने घेतलेले निर्णय, त्यावर ठामपणे जगणे हे प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे. हीच प्रेरणा घेऊन संकल्पमय जीवनाचा मार्ग अवलंबने, आदर्श विचार करून जगणे हीच पूज्य आचार्यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे स्मरण करणे होय.

Share post
Tags: #Acharya Samrat 1008 Pujya Shri Jaymalji M.S. His 315th birth anniversary#आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सव#जैन हिल्स
Previous Post

पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Next Post

अंगावर वीज पडून बाप लोकाचा दुर्दैवी मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील घटना

Next Post
अंगावर वीज पडून बाप लोकाचा दुर्दैवी मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील घटना

अंगावर वीज पडून बाप लोकाचा दुर्दैवी मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group