जळगाव (प्रतिनिधी) – येथील “जळगावचा राजा”श्री नेहरू चौक मित्र मंडळच्या दर्शनासाठी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आणि धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भेट दिली. जळगावच्या राजा श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी, “जळगावकरांवरील विविध संकट दूर होवो” असे साकडे घातले.
गुलाबराव वाघ आणि निलेश चौधरी यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष अजय कुमार गांधी यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष संदीप रडे, युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, प्रकाश जैन, आनंद हेड, लीलाधर अत्तरदे, आकाश मंडोरा, सचिन लाहोटी, महेश ठाकूर, विशाल परदेशी आदी उपस्थित होते.