जळगाव – माहेश्वरी विद्या प्रसारक संचलित अभिनव माध्यमिक विद्यालय येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यालयात इयत्ता नववी मधील आयान खान पठाण या विद्यार्थ्याने पर्यावरण पूरक सुंदर अशी गणेश मूर्ती गणेश स्थापनेसाठी दिली. तसेच या वर्षी विद्यालयातर्फे गणेशोत्सव विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या लोकसभागातून सजावट व प्रसादाचे नियोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा मोदक प्रसाद म्हणून दिला. लेझिम ,सजावट, रांगोळी, हार , ह्यात विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने सहभाग नोंदविला.
यावेळी सामाजिक सलोखा, एकात्मता जपण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, वसुंधरा संवर्धन म्हणून प्लास्टिक मुक्त शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा यावर विविध वेशभूषा सदर करीत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता, समाजामध्ये सद्भावना हा संदेश दिला या उपक्रमाचे कौतुक म्हणून जळगाव जिल्हा अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी स्वतः विद्यालयात भेट देऊन आयान खान व त्याच्या कुटुंबियांचे सत्कार व कौतुक केले तसेच अभिनव विद्यालयातील हा अभिनव उपक्रम समाजाला तसेच सर्व देशाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला.
यावेळी श्री मुंडे साहेब यांनी गणपतीची आरती केली. यावेळी विद्यालयातील संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय जी बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोदजी बियाणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सरोज दिलीप तिवारी ,श्री हेमंत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते