यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गोरगरीब , विधवा व वयोवृद्धांना शासनाच्या वतीने मिळणाऱ्या संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातुन प्रस्ताव मंजुर झालेल्या गरजु लाभार्थ्यांना मागील एका वर्षापासून अद्याप अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत दिसुन येत असुन त्यांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत असून जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे.
यावल तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार समिती गठीत असुन या समिती व्दारे राज्य शासनाच्या सामाजीक व न्याय विभागाच्या माध्यमातुन विधवा , निराधार, वयोवृद्ध जेष्ठ नागरीक , इंदीरा गांधी भुमीहीन अशा घटकांना प्रतिमाह एक हजार मदत दिली जाते , मागील वर्षाच्या ऑगस्ट महीन्यात संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने बैठकीत सुमारे चार शे प्रस्ताव मंजुर करण्यात आली असुन, या सर्व लाभार्थ्यांना तसे पत्र देखील प्राप्त झाले आहे मात्र असे असतांना मागील एक वर्षापासुन त्यांच्या खात्यात अनुदान कधी पडेल या प्रतिक्षेत आहे .
जिल्हाधिकारी यांनी संदर्भात पाठपुरावा करून प्रस्ताव मंजुर झालेले वयोवृद्ध जेष्ठ नागरीक , विधवा निराधार , इंदीरा गांधी भुमीहीन गोरगरीब लाभार्थ्याना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात येत आहे .