जळगाव – जळगाव शहरातील सागर पार्कवर दही हंडी सोहळ्यादरम्यान एक तरुण थेट दही हंडी लटकविलेल्या क्रेन मशीनवर चढून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सूत्र संचालकांनी विनंती गेल्यावर हा तरुण खाली उतरला. दही हंडी फोडण्यासाठी आलेल्या एका पथकातील हा गोविंदा असल्याची माहिती समोर आली आहे.
सागर पार्क मैदानावर फाउंडेशन च्या वतीने सालाबजाप्रमाणे यावर्षीही कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती होती. या ठिकाणी तरुणांचा प्रचंड जल्लोष व उत्साह पाहायला मिळाला ढोल ताशांचा पथक डीजे मधील गाण थिरकली असल्याचे पाहायला मिळाले.
अनोखा उत्साह जल्लोष साऱ्या यादरम्यान दहीहंडी फोडण्यासाठी आलेला गोविंदा पथकातील एक तरुण अचानक दहीहंडी लटकवलेल्या क्रेनमशीनवर चढला. यावेळी प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणी आयोजकांकडून तरुणाला खाली उतरण्याची विनंती करण्यात आली. तब्बल ६० फुटांची दहीहंडी होती. हा गोविंदा ३० ते ४० फुटावर चढला. यावेळी प्रचंड जल्लोष सुरू असताना शुकशुकाट झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वांचे लक्ष तरुणाकडे होते. सर्व जण थक्क झाले होते. थोड्या वेळाने तरुण खाली उतरला. हा तरुण दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पथकातील गोविंदा असल्याची माहिती समोर आली आहे तो क्रेन मशीन वरून आयोजकांसह उपस्थित सर्वांना भांड्यात पडला होता.