Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Divya Jalgaon Team
August 17, 2022
in जळगाव, राजकीय
0
जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर – १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर ह्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली.

दि १६ ऑगस्ट रोजी ह्या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही.

ह्या जनसंवाद यात्रेचे जो तो ज्याच्या त्याच्या परीने विश्लेषण करेल परंतु कुठल्याही प्रकारच्या निवडणुका समोर किंवा जवळ नसतांना लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या निराकरणासाठी निघालेली ही एकमेव यात्रा असावी. त्यामुळे स्वार्थासाठी ही यात्रा आहे अशी कोल्हेकुई करण्याचा जे प्रयत्न करतील बोलती बंदच झाली आहे. ज्यांचा पिंडचं जनसेवेचा आहे त्यांना लोकांशी संवाद साधण्यासाठी निवडणुकीची गरज नसते. जनसेवा हा त्यांचा ठायी स्वभाव असतो. हे रोहिणीताईंच्या ह्या जनसंवाद यात्रेतून अधोरेखित झाले आहे.

१६ ऑगस्ट रोजी जुनोना ,सोनाटी , अमदगावं ,हिंगणे असा सुरू झालेला प्रवास त्यात स्थानिक नागरिकांचा उत्साह बघता रोहिणीताईंची जनसंवाद यात्रा हे आपल्या हक्काचे व्यासपीठ असल्याचे जाणवले. लोकांनी घरकुल, मनरेगा विहिरींचे न मिळलेल अनुदान , विधवा महिला ,वृद्धांचे पगार , व्यायामशाळा , क्रीडांगण , सभागृह अशा समस्या मांडल्या नुसत्या मांडल्याच नाही तर त्याबाबत आग्रही मागणी केली. नाथाभाऊंनी आमच्या गावासाठी रस्ते दिले , सभागृह दिले , ज्या सुविधा दिसतायत त्या भाऊंनी दिल्या आहेत असे नागरिक ठिकठिकाणी प्रतिक्रिया देतांना सांगत होते. आमचा तालुका दुर्लक्षित होता पण १९९० साली नाथाभाऊ आमदार झाले तेव्हापासून डांबरी रस्त्यांचे इथे जाळे विणले गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रोहिणीताईंनी सुद्धा लोकांच्या ह्या समस्या ,अडचणी जाणून घेतल्या. “एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही.”असे सांगत भाऊंच्या माध्यमातून आता आपल्या समस्या सोडविल्या जातील त्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि मी स्वतः सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तुमच्या चेहऱ्यावर आज दिसत असलेले समाधान हीच आमची पुण्याई आहे ,जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन असे आश्वस्त केले.

Share post
Tags: #Khadse family#Rastrawadi congress#Rohini Khadse#जनसंवाद यात्राMuktainagar
Previous Post

आ.चंद्रकांत पाटील “पलटी मारणारा माणूस”- आ.अनिल पाटील

Next Post

सागर पार्क वरील एल. के. फाउंडेशन आयोजित दही हंडी सोहळ्यात एक तरुण थेट क्रेन मशीनवर चढला

Next Post
सागर पार्क वरील एल. के. फाउंडेशन आयोजित दही हंडी सोहळ्यात एक तरुण थेट क्रेन मशीनवर चढला

सागर पार्क वरील एल. के. फाउंडेशन आयोजित दही हंडी सोहळ्यात एक तरुण थेट क्रेन मशीनवर चढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group