कर्जाणे ता.चोपडा – येथील कै.वि.प्र.देशमुख प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक पदी आयु.रामचंद्र अमृत आखाडे यांची संस्थेने नियुक्ती केल्याबद्दल चोपडा तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटना व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रामचंद्र आखाडे यांचा सत्कार जेष्ठ पदवीधर शिक्षक गोपाळराव बाविस्कर व तालुकाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यांत आला व अभिनंदन केले.
यावेळी मनोगतात भरत शिरसाठ यांनी आयु.रामचंद्र आखाडे यांची कामसूवृती, शाळेविषयी प्रामणिकपणा, आपले कष्टमय जिवन तसेच नवनविन उपक्रम कौशल्यवृत्ती या गुणामुळे सरांना अगदी कमी वयात मुख्याध्यापक पदी नियुक्ती ही अभिमानास्पद गोष्ट असून यामुळेच सरांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारीनी हार्दिक शुभेच्छा देवून सहपत्नीक सत्कार केला .
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत शिरसाठ, सरचिटणीस देवानंद वाघ, संघटक संजय सांळुखे, गोपाळराव बाविस्कर,छोटू वारडे, दिपक मेढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.