परळी वृत्तसंस्था – राजस्थानहून आलेला गुटखा माफियांना वितरित करत असताना परळी शहरातील इटके कॉर्नर येथे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता कारवाई करण्यात आली. डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमध्ये हा गुटखा नेला जात होता. १० लाख ४८ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. कंटेनरचालकास अटक झाली आहे.
शहरातील संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे पोलिसांची गस्त सुरू होती. इटके कॉर्नर येथे पहाटे साडेतीन वाजता पोलिसांना एक संशयास्पद कंटेनर दिसून आला. पोलिसांनी मालाचा परवाना आहे का? याची तपासणी केली असता कंटेनरमध्ये गुटखा आढळून आल्याने चालकासहित कंटेनर ताब्यात घेतला.