मुंबई वृत्तसंस्था – मीरा-भाईंदर मनपाच्या सार्वजनिक प्रसाधनगृह बांधकामात १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांनी सेवाडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
त्या सुनावणीस गैरहजर राहिल्याने राऊत यांच्याविरोधात न्यायालयाने जामीनपात्र वाॅरंट बजावले आहे. हजर राहण्यासाठी कोर्टाने गेल्या महिन्यात आदेश दिले होते. परंतु सोमवारी राऊत किंवा त्यांचे वकील दोघेही गैरहजर राहिले. त्यामुळे कोर्टाने वॉरंट बजावले असून पुढील सुनावणी १८ जुलैला होईल.