जळगाव – तांबापुरा परिसरात दारू पिण्यावरून आणि पैशांच्या वादातून दोन तरुणांत वाद झाले. तांबापुरा भागातील महादेव मंदिर परिसरात दारू व पैशांच्या कारणावरून दोन जणांत वाद झाला.
त्यानंतर दोघांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने आपापल्या गटातील तरुणांना बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही गटातील तरुणांकडून तुफान दगडफेक व काचेच्या बाटल्या फोडल्या.
या दंगलीत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वीच तांबापुरात दंगल घडली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर रात्री नियंत्रण मिळवले होते.