अमरावती (वृत्तसंस्था) – तब्बल ३६ दिवसांनंतर शहरात परतलेले खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांचे स्वागत करताना रात्री उशिरा डीजे वाजवल्याने आणि वाहतुकीस अडथळा केल्याबद्दल राणा दांपत्य आणि क्रेन चालक व मालकाविराेधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शनिवारी रात्री शहरात विविध ठिकाणी राणा दांपत्याचे स्वागत करण्यात आले. डीजे वाजला, रॅली काढण्यात आली. दोन ठिकाणी क्रेनद्वारे राणा दांपत्यास गळ्यात हार टाकण्यात आले. तसेच शंकरनगर भागात उशिरा रात्री दुग्धाभिषेक करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी रॅली आयोजक, क्रेन मालक व क्रेन चालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.