जळगाव- जिल्ह्यातील केळी पिक विमा निकष बदलवून पूर्वी प्रमाणे मिळण्याबाबत व गेल्या २ महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दि.९ नोव्हेंबर २०२० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यातर्फे भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे नितृत्व माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन व जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे करणार असून याप्रसंगी खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष दादा पाटील, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंदूभाई पटेल, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आ.स्मिताताई वाघ,जनजातीय संपर्क प्रमुख अॅड किशोर भाऊ काळकर बेटी बचाव राष्ट्रीय सह डॉ.राजेंद्र फडके, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या भव्य मोर्चाला जळगाव जिल्ह्यातील जि.प.सदस्य, जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, जि.प.सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती साभापाती व सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, विविध आघाडी अध्यक्ष व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले आहे. असे जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.