जळगाव प्रतिनिधी । सुन्नी इदगाह मैदानाजवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलीसांनी शनिवारी रात्री धाड टाकून कारवाई केली. तीन मोटारसायकलींसह १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.इदगाह मैदानाजवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची धाड.
त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले तर एक फरार झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इदगाह मैदानाजवळ बिसमील्ला नगरजवळील मोकळ्या जागेत शनीवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बेकायदेशीर झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली.इदगाह मैदानाजवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची धाड.
या कारवाईत तीन मोटारसायकली, रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकुण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केले. इदगाह मैदानाजवळ झन्ना मन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची धाड. समील इंदू पिंजारी (वय-३८), ईश्वर मोरसिंग चव्हाण (वय-३७), जावेद खान मनसफ खान (वय-२६) तिघे रा. सुप्रिम कॉलनी, करतार नारायण वंजारी (वय-३५, रा. जयभावानी चौक), नासीर गुलमा पटेल (वय-२३), राजू फकिरा पटेल (वय-४०) दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी यांनी अटक केली आहे.
सहाही संशयित आरोपींवर पो.कॉ. रविंद्र मोतीराया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदिवण्यात आला. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोहेकॉ कैलास सोनवणे, पोहेकॉ अनिल पाटील, विजय काळे, किरण धमके, रविंद्र मोतीराया, अशोक फुसे, पोहेकॉ किरण धमके यांनी ही कारवाई केली.
अजून वाचा
भाजपा कार्यालयात जाळपोळ करणारा मनोरुग्ण अटकेत