जळगाव – संस्कार म्हणजे समाजमनात एक संस्कृत आणि आदर्श व्यक्ती म्हणून आपल्या पाल्याची ओळख निर्माण व्हावी हे प्रत्येक पालकाला वाटते. याच अनुषंगाने आजोळी आलेली कु.आराध्या राहूल कुटासकर या चिमुकलीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमणुकीचे व मनोरंजनात्मक कार्यक्रमाला महत्व न देता, एका आपुलकी, जिव्हाळा जपून सौदार्हपणे रिमांड होम मधील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करिता आपला वाढदिवस रिमांड होम मधील मुला-मुलींसोबत साजरा केला.
बालपण हे संस्कार घडविण्याचे वय असते या काळात त्यांच्या बालमनावर केलेले संस्कार हे आयुष्य भराचे सोबती असतात, यातूनच समजाप्रती आपल काहीतरी देणं लागते ही भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात होते, या वयात मिळणाऱ्या संस्काराच्या शिदोरीवरच त्यांच्या पुढील आयुष्यातील इमारत पाहण्यास आपल्याला मिळते.आजकालच्या धकधकीच्या जीवनात पैसे तर सहज मिळतात पण अनमोल असे संस्कार आपल्याला पैसे देऊन ही विकत घेता येत नसतात. कु.आराध्या राहूल कुटासकर या चिमुकलीचा हा स्तुत्य उपक्रम तिला व इतरांना ही प्रेरणादायी नक्कीच ठरेल यात शंका नाही.
या प्रसंगी कु.आराध्या कुटासकर हिच्या सोबत नयना कुटासकर, अनघा कुटासकर, सुषमा कुटुंबळे, दिलीप कुटुंबळे उपस्थित होते यावेळी जळगाव जिल्हा बालसुधारक गृह अधिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या वतीने कु.आराध्या कुटासकर हिचा सत्कार करण्यात आला.