जळगांव – राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा जळगांव चे समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांचे वतीने जळगांव येथील इच्छादेवी चौक येथे जळगांव पाचोरा रोड वर अवैधरित्या चालणाऱ्या तत्सम वाहने मॅजिक, मॅक्सीमो इ.वाहनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच अवैध प्रवासी वाहतुक तात्काळ थांबवून इच्छादेवी चौक पोलिस स्टेशन पासुन पुढे शंभर मिटर रस्ता नो पार्किंग झोन जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व त्या निवेदनाची प्रत पोलिस अधिक्षक , वाहतुक शाखा पोलिस निरिक्षक, आर टी ओ तसेच पोलीस निरिक्षक रामानंद पोलीस स्टेशन व एम आय डी सी पोलिस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे, उपाध्यक्ष प्रविण माळी,सरचिटणीस चंद्रमणी सोनवणे, उपाध्यक्ष राहुल पारचा, अविनाश, चेतन अण्णा चांगरे संगिले, क्रुष्णा सपकाळे, कुमोद भाऊ चांगरे, यश भाऊ चांगरे, रोनक चांगरे, मोहित चांगरे, परिश चांगरे अंकुश भाऊ पाटील आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.