जळगाव – मोहाडी रस्त्यावरून दुचाकीवर जात असताना सुजय गणेश सोनवणे मुलगा ट्रक खाली चिरडल्याची घटना घडली आहे. जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावर अपघात झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अपघात झालेल्या ट्रक वर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली असून घटनस्थळावर तणावपूर्ण शांतता आहे. मृत झालेल्या बालकाचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून पुढील तपास चक्रे पोलीस फिरवत आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या या बालकाचा अपघातात अंत झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हळहळले आहे.
अधिक अशी की, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे, नगरसेविका रंजना प्रभाकर सोनवणे यांचे नातू व मोहाडीचे माजी सरपंच गणेश प्रभाकर सोनवणे यांचे सुपुत्र सुजय गणेश सोनवणे (वय13) हा शेवटचा पेपर असल्याने सेंट टेरेसा इथे आपल्या शाळेत जात होता, या दरम्यान घरून निघाल्यानंतर मोहाडी रस्त्यावरच भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक ने सुजय च्यादुचाकीला जोरदार धडक दिल्याने सुजय चा जागीच अंत झाला आहे.