जळगाव प्रतिनिधी – द कश्मीर फाइल्स हा सिनेमा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने करमुक्त करावे या संदर्भात युवासेना जळगाव महानगरतर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले. या वेळी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर युवाधिकारी यश सपकाळे, हितेश ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग युवाधिकारी चेतन कापसे, अमोल मोरे, युवा सैनिक अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे व युवासेना जळगाव महानगरचे पदाधिकारी उपस्थित होते.


