पाळधी – येथील नोबल इंटरनेशनल स्कूल नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपले स्थान टिकवून आहे. तसेच दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्रत्यक्ष कोणतेही शालेत कार्यक्रम नसले तरी ह्यावर्षी एज्युकेशन फेयर उत्साहात चे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांकडुन विविध शैक्षणिक प्रॉजेक्ट सादर करण्यात आले तर शाळेच्या संचालिका अर्चना सुर्यवंशी ह्यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यानी गनिताची जादू, पाण्याची डेनसिटी तसेच वोल्केनो वॉटर सायकल असे विविध प्रोजेक्ट सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योती जाधव सोबत पाळधी गावचे सरपंच लक्षमी कोळी, निशा पवार, शारदा कासट यांची उपस्थिती होती तसेच ज्योती जाधव ह्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रभा माली, सरस्वती जोशी, शायस्ता कुरेशी ह्यांनी केले. तर कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी गायत्री पाटील सुजाता पाटील ,केशव महाजनी व प्रशांत सोनवने व इतर शिक्षकांनी मेहनत घेतली.