मेष:-गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याच्या योग होणार. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात लाभ होणार. सामाजिक कार्य करण्याच्या मान मिळणार.
वृषभ:- नवीन मित्र तुम्हाला लाभणार. नवीन वाहने घेण्यासाठी प्रयन्त करू शकतात. आर्थिक लाभ मिळणार. मित्राच्या ओळखीचा लाभ तुम्हाला मिळणार.
मिथुन:- मनासारखं खरेदी करू शकतात. जास्त विचार करणे टाळणे हेच तुमच्यासाठी योग्य निर्णय. कोणाबद्दल ही गैरसमज करू नका.
कर्क:- मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
सिंह:- अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
कन्या:- गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.
तूळ:- जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.
वृश्चिक:- आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.
धनू:- पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.
मकर:- कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.
कुंभ:- मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.
मीन:- कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.