Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

तरुण पिढी सह सर्वांसाठीचे हे प्रेरणास्थान असल्याचा गौरव

by Divya Jalgaon Team
March 1, 2022
in जळगाव, सामाजिक
0
गांधीतीर्थ हे तर भारतातील पाचवे धाम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जळगाव – पूज्य बापूंच्या स्मरणार्थ बांधलेले गांधी धाम हे भारतातील पाचवे धाम असल्याचे दिसते. बापूंचे जीवन आणि जीवन दृश्य येथे चित्रित केले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेऊ शकतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात. श्री भवरलाल जैन यांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन! अशी लिखीत प्रतिक्रिया महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदविली. महामहीम राज्यपाल यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ ला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची अनिवार्यता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधी तीर्थ पोहचवित आहे. त्यांचे हे कार्य पाहून माननीय राज्यपाल भारावले. जगातिल सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुमारे तासभर भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुतीहार देऊन स्वागत केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.

गांधी तीर्थ साकारतांना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे निर्मिती उद्दीष्टाचे कार्य आजदेखील प्रभावीपणे होत आहे.

Share post
Tags: #अतुलजैन#गांधीरिसर्चफाउंडेशनचेमुख्यसमन्वयकउदय महाजन#जैनइरिगेशनचेअध्यक्षतथागांधीरिसर्चफाउंडेशनचेसंचालकअशोकजैन#डॉ.सुदर्शनआयंगार#राज्यपालभगतसिं कोश्यारी#श्रीभवरलालजैन
Previous Post

राज्यपालांनी जाणून घेतले जैनचे उच्च कृषितंत्रज्ञान – (व्हिडिओ)

Next Post

थोरगव्हाण येथील पत्नीचा खुन केलेल्या पतीला चार दिवसाची कोठडी

Next Post
थोरगव्हाण येथील पत्नीचा खुन केलेल्या पतीला चार दिवसाची कोठडी

थोरगव्हाण येथील पत्नीचा खुन केलेल्या पतीला चार दिवसाची कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group