जळगांव – जागतिक मराठी दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२२ रोजी काव्य रत्नावली चौक जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगांव शहर तर्फे “या मराठीत स्वाक्षरी करा” असे उपक्रम मोहीम राबविण्यात आले. त्याला जळगाव शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी मराठी नाट्य कलाकार रमेश भोळे यांचा व मराठी भाषा शिक्षक श्री सय्यद फईम पटेल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे, जनहित चे रज्जाक सय्यद, मतींन पटेल, ललित शर्मा, संदीप पाटील, साजन पाटील, रस्ते आस्थापना चे योगेश पाटील ,श्री सैदाणे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील व मराठी भाषा प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.