जळगाव – लग्नात संसारोपयोगी वस्तू दिल्या नाही, मूलबाळ होत नाही, तू वेडी आहेस असे भिनवून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडेरावनगरातील माहेर असलेल्या आयशा सद्दाम पिंजारी (वय २२) यांचे लग्न मध्य प्रदेशातील बडवाडी येथील सद्दाम लतिफ पिंजारी यांच्याशी सन २०१८ मध्ये झाले. माहेरच्या लोकांनी लग्नात चांगल्या संसारोपयोगी वस्तू दिल्या नाहीत, या प्रकरणी आयशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती सद्दाम लतिफ पिंजारी, सासू सायरा, सासरे लतिफ छगन पिंजारी, दीर एजाज यांच्यासह दहा जणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.