मेष:- तुमच्या स्वभावानुसार तुम्ही निर्णय घ्यावेत. त्यामुळे तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला जे लोक सहकार्य करत असतात त्यांना तुम्ही आभार मानायला विसरू नका. आपला जीवन हे आपल्या मर्जीने व योग्य पद्धतीने जगा. तुम्ही यशस्वी नक्की होणार.
वृषभ:- अनपेक्षित तुम्हाला लाभ होणार. मुलांना सांभाळण्यात तुमच्या आजच दिवस जाणार. नाटक व सिनेमा पाहण्याचा वेळ मिळेल. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ मिळेल.
मिथुन:- दिवसभर कामातच व्यस्त जाईल. तुमच्या कामात एकसूत्रता ठेवावी. वातावरण प्रसन्न राहील.
कर्क:- नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचं जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.
सिंह:- कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल.
कन्या:- घरगुती वातावरणात शांतता ठेवावी. घरात खर्च आटोक्यात घ्यावे. दिवस घाईघाईत जाणार.
तूळ:- खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल.घरात तुमचे प्रभुत्व राहील.
वृश्चिक:-घरात तुमचे प्रभुत्व राहील. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.
धनू:- तुमच्या बोलण्याने लोक तुमच्यावर प्रभावी होणार. तुमच्या बौद्धिक योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल.
मकर:- सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
कुंभ:- कलेच्या सर्वत्र कौतुक होणार. नवीन मित्र तुम्ही जोडत राहावे.आज अचानक तुम्हाला धनलाभ संभवतो.
मीन:- तुमची फसवणूक होऊ शकते.कोणतेही निर्णय सावध घ्यावे. कामात खुश असाल. कामात येणारे अडथळे दूर करावे.


