जळगाव प्रतिनिधी – शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास एलसीबीच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. रूपेश संजय पाटील (रा. साखरे, ता. धरणगाव) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने चोरीच्या पाच दुचाकी काढून दिल्या आहेत. यात जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन व नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यातील पाच दुचाकींचा समावेश आहे. त्याला जिल्हापेठ पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.