जळगाव प्रतिनिधी – आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून रखडलेले मानधन तातडीने मिळावे. तसेच प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आशा सेविका व गटप्रवर्तकांनी सोमवारी महापालिकेवर लाटणे मोर्चा काढला. यावेळी महापालिकेच्या इमारतीसमोर निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विजय पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. २०२० साली अशा सेविकांना दर महा २००० व गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन वाढ करण्याचा शासकीय आदेश काढला होता; परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही यासह विविध मागण्या केल्या. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून रखडलेले मानधन तातडीने मिळावे. तसेच प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आशा सेविका व गटप्रवर्तकांनी सोमवारी महापालिकेवर लाटणे मोर्चा काढला.
यावेळी महापालिकेच्या इमारतीसमोर निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विजय पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. २०२० साली अशा सेविकांना दर महा २००० व गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन वाढ करण्याचा शासकीय आदेश काढला होता; परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही यासह विविध मागण्या केल्या.