जळगाव, प्रतिनिधी । जैन इर्रिगशेन सिस्टिम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाउंडेशनतर्फे जाणीव बहुद्देश्यीय संस्थेतील एच.आय.व्ही. ग्रस्त विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्न म्हणून शिलाई मशीन देण्यात आली.
यावेळी शिलाई माशिन लाभार्थी महिला नामे – लता राणे, वंदना पाटील, शालिनी चौधरी तसेच युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, पियूष हसवाल, सयाजी जाधव, सौरभ कुलकर्णी, संस्कृति नेवे, भटू अग्रवाल, पीयूष तिवारी यांच्या सोबतच एच.आय.व्ही. ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या जाणीव बहुद्देश्यीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बागुल, सचिव-प्रवीण पाटिल उपस्थित होते.