जळगाव, प्रतिनिधी । शानबाग सभागृह येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगांव जिल्हातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात युवक जिल्हा अध्यक्षपदी अनिल (छोटू) शिंदे जामनेर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जळगांव तालुका अध्यक्षपदी दिलीप शालिग्राम जगताप रिधूर् तर जिल्हा सह कार्याध्यक्षपदी किशोर मधूकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमन गांगुर्डे, पल्लवी शिरसाठ भडगांव, सचिव माधवी निंबाळकर, सरचिटणीस संगीता पगारे, संपर्क प्रमुख सरला खोंडे, मीनाक्षी वखरे बोदवड, संघटक अनिता वाघीले, दिपाली इंगळे जामनेर, जोस्ना शिरसाठ पाचोरा, प्रसिध्द प्रमुखपदी ममता खोंडे तर जिल्हा कार्यकारणी सदस्य अलका सोनवणे, माधुरी बोरसे, उर्मिला सोनवणे, शितल बोरसे, प्रतिभा वाघ, जोष्ना शिरसाठ, योगिता सोनवणे, संगीता शिरसागर, योगिता सैंदाणे यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला प्रदेश अध्यक्ष भारती सोनवणे, जळगांव जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता गवळी, कर्मचारी संघ जिल्हा अध्यक्ष मनोहर खोंडे, सचिव कुमार शिरामे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शिवाजीराव बहालकर्, उमाकांत निकम, सरचिटणीस रवींद्र शिरसाठ, नलिनी पवार यांची उपस्थिती होती. तसेच नरेश गर्गे, दिलीप शिरसाठ पाचोरा, दिलीप सोनवणे अमळनेर, विवेक वखरे, संजय वाघ, राजेंद्र डापसे बोधवड, साळुंके गुरुजी जामनेर, रवींद्र सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे चोपडा यासह जगदीश वाघ, अलका सोनवणे, ऑल इंडिया सेन समाज सचिव राजकुमार गवळी, जगदीश निकम, संजय सोनवणे, गणेश सोनवणे, भिकन बोरसे, अरुण वसाने, योगेश वाघ, गवळी यांनी सहकार्य केले.