मुंबई, वृत्तसंस्था । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरील पुढील लिंकवर पाहता येईल.
राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या ऊर्जा विभागाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे. कृषीपंप जोडणी धोरण आणि अपारंपरिक ऊर्जा धोरणांची वैशिष्ट्ये, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊर्जा विभागाचे प्रयत्न, उद्योगांना दिलासा देण्यासाठी उचललेली पाऊले, निसर्ग चक्रीवादळ तसेच तोक्ते चक्रीवादळात ऊर्जा विभागाने केलेला विविध आव्हानांचा मुकाबला, मुंबईचा वीजपुरवठा 12 ऑक्टोबर 2020 रोजी अचानक खंडित झाला असताना तो सुरू करण्यासाठी केलेले युद्ध पातळीवरील प्रयत्न,कोरोना काळात टाळेबंदी लागू असताना ऊर्जा विभागाचे काम, भविष्यासाठी निरंतर ऊर्जेसाठीचे नियोजन अशा सर्व निर्णयांची व विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमातून दिली आहे.