जळगाव, प्रतिनिधी । येथील पी ई तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये कार्यरत शिक्षक व गेंदालाल मिल मधील रहिवासी तथा मनियार बिरादरीचे सदस्य मोहम्मद आसिफ शेख रहीम यांनी नुकत्याच झालेल्या उर्दू सेट परीक्षेत ओबीसी कैटेगिरीतून महाराष्ट्र राज्यातून फक्त ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जळगाव जिल्ह्याचे व मनियार बिरादरीचे नाव अजरामर केल्या बाबत त्यांचा गौरव जळगाव जिल्हा मनियार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनियार बिरादरीचे महानगर अध्यक्ष सय्यद चाँद तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष फारुक शेख होते यावेळी बिरादरीचे सलीम मोहम्मद, तय्यब शेख, अब्दुल बारी, एजाज सैयद,अल्ताफ शेख हारून शेख सादिक मूसा, मुज़ाहिद खान, मुश्ताक शेख, हारून महेबुब आदींची उपस्थिती होती.
मोहम्मद आसिफ चा शैक्षणिक प्रगती चा आलेख
गेंदालाल मिल मधील रहिवासी असलेले मोहम्मद आसिफ यांचे शिक्षण जळगाव येथे झाले असून बारावी परीक्षा नंतर त्यांनी जळगाव शहरात रोजंदारीवर बांधकाम ठेकेदाराकडे काम केले त्यानंतर जळगावातील हल्लीचे मेंमन बिरादरीचे अध्यक्ष कादर कच्ची, यांच्या कार्यालयात कार्यालयीन काम केले ते काम करत असताना त्यांनी सर्वप्रथम बिलीफ व एम लीफ डिग्री मिळवली त्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या मार्फत एम ए केले या अवधीत त्यांनी अल्फा ट्रेडर्स व अक्कलकुवा या ठिकाणी नोकरी करून आपला अभ्यासक्रम सुरू ठेवला त्यानंतर त्यांनी सेट परीक्षेची तयारी केली व सेट परीक्षा उत्तीर्ण झाले याच वेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठातून पीएचडी चे रजिस्ट्रेशन केले असून त्यांचे पीएचडी चे कार्य अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे अशाप्रकारे रोजंदारीवर काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले शिक्षणासोबत घरातील कुटुंब उदरनिर्वाहाच्या कामासाठी काम करीत गेले या अवधीत लग्न सुद्धा झाले व दोन मुलांचा सांभाळ करून त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले व पीएचडी मध्ये सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले आहेत असे खडतर जीवनात सुद्धा त्यांनी अभ्यास क्रमाला महत्त्व देत ते उर्दू विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.
त्यांच्या यशस्वीतेसाठी यांचा होता सहभाग
फार्मेसी कॉलेज चे राहुल पाटिल,मेंमन बिरादरीचे कादर कच्ची, नूतन मराठा महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर प्रोफेसर एम इकबाल,डॉक्टर बी ए पटेल, डॉक्टर शरणकुमार निंबाळे, अब्दुल गनी, तसेच अक्कलकुवा अरबी मदरसा चे मौलाना मस्तानवी व तेथील सहकारी तसेच जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे त्यांना सहकार्य मिळालेले आहे.