जळगाव, प्रतिनिधी । कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (बुरखा) घालण्यास बंदी घातली गेली त्याविरोधात मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केले असता ती बंदी कही अंशी उठवण्यात आली परंतु ज्या विद्यार्थिनी हिजाब घालून येतील त्या विद्यार्थिनींना वेगळ्या क्लास रूम( वर्ग खोली) मध्ये बसवण्यात येईल असे ठरले त्यावरही विद्यार्थिनीनी आपली सहमती दर्शवली असता आज विद्यार्थिनी आपल्या शिक्षणासाठी महाविद्यालयात येतांना त्यांना काही भगवा मफलर (पट्टा) धारण केलेले तरुण युवकांनी महाविद्यालयात येण्यास मज्जाव केला.
या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील हिंदू- मुस्लिम महिला यांनी प्रतिसाद देत जिल्हाअधिकारी कार्यलय गाठुन कर्नाटक सरकार चा तिव्र निषेध करून जिल्हाधिकारी जळगाव मार्फत माननीय पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख चार मागण्या
१)कर्नाटक सरकारला त्वरित सुचित करण्यात यावे की ज्या शिक्षण संस्थानी हिजाब (बुरखा )वर विद्यार्थिनींवर लावलेली बंदी मागे घेण्यात यावी.
२)भारतीय घटनेतील कलम २५ अनुसार प्रत्येक भारतीयाला जे स्वातंत्र्य दिलेले आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर शिक्षण संस्थांनी गदा आणता कामा नये
३)कर्नाटक मधील शिक्षण संस्थांना आदेश पारित करावे की मुस्लिम विद्यार्थिनींचे सोबत विद्यार्थिनींना फ्रीडम ऑफ चॉइस देण्यात यावे व त्यांना सर्वा सोबत वर्गा मधे बसु द्यावे
४) अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात- शाळेत येत आहेत त्यांना भगवाधारी तरुणाई रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या तरुणाई वर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करून त्या मुस्लिम विद्यार्थिनींना सरकारने सुरक्षा प्रदान करावी
शासनाला अल्टिमेटम
कर्नाटक शासनाने वेळीच आपले निर्बंध हटवले नाही व मुस्लिम विद्यार्थिनींना सुरक्षा प्रदान केली नाही तर जळगाव जिल्ह्यातून त्यांच्या कृती च्या निषेधार्थ सर्वधर्मीय महिला व पुरुष मिळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू त्यात रॅली, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, आदींचा समावेश राहील असे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी आन्दोलका समोरआपल्या भावना व्यक्त केल्या.
निवेदनावर व निवेदन देताना यांची होती उपस्थिती
एरंडोल नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती शकुंतला अहिरराव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या सौ प्रतिभा शिरसाट, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, भुसावळच्या जयश्री इंगळे, वरणगावच्या सविता माळी व शारदा वाणी, जळगावच्या हाजरा फारुक शेख, एडव्होकेट नसरून फातेमा पिरजादे, बुशरा अमीर शेख, फरज़ाना अनिस शाह, निखत परवीन ,आदना कश्यप, हुमेरा तय्यब शेख, सायमा तय्यब शेख, तकदीस ताहेर शेख , शगुफ्ता शिरीन, फारुक शेख अब्दुल्ला, अनीस शाह,एम आय एम उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी कृती समितीचे तथा विदर्भाचे प्रमुख सनेर सय्यद, अकील अहमद, मोहम्मद इस्माईल, शौकत अली पेंटर मेहरून, आसिफ शेख गफार, एरंडोल चे इम्रान सय्यद, मुस्ताक शेख,शाह बिरादरीचे मुक्तार शाह, उस्मानीया पार्कचे समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मजहर पठाण, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकिर पठाण, समाजवादी पक्षाचे इक्बाल उद्दीन शेख व महिला आघाडी प्रमुख साजिया शेख, काँग्रेसचे बाबा देशमुख व नदीम काझी, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार व अकील पटेल ,कुल जमातीचे डॉक्टर जावेद शेख, वहीदत ए इस्लामी चे अतीक शेख, जळगाव स्पोर्टस हाऊसचे एडवोकेट अमीर शेख, एम आय एम चे जिल्हाअध्यक्ष अहमद सर व महानगर अध्यक्ष दानिश सय्यद, अपनी गलीचे आताऊल्ला खान, शिकलगार बिरादरीचे अन्वर खान व अज़ीज़ शिकलकर, काकर बिरादरीचे रियाज काकर ,खाटीक बिरादरीचे डॉक्टर रिजवान खाटीक, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.