मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. गारपिटीचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती निवळल्यानंतर पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर दोन दिवसांनंतर पश्चिम भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.