Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर उद्या जळगाव जिल्ह्यात

by Divya Jalgaon Team
February 7, 2022
in जळगाव, राजकीय
0
महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर उद्या जळगाव जिल्ह्यात

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी“ या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. 08 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे सकाळी 11.00 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी“ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचं काम आयोगाद्वारे करत आहे. जळगाव जिल्हयात होणाऱ्या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्या, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Share post
Previous Post

ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे पाचव्या सत्रात वड्री गावातील नागरिकांचा प्रतिसाद

Next Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ८ फेब्रुवारी २०२२

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, मंगळवार, ८ फेब्रुवारी २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group