अमळनेर, प्रतिनिधी । बाटलीमध्ये पेट्रोल भरून दिले नाही म्हणून तीन जणांनी पंपावर काम करणाऱ्या ऑपरेटर ला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे रा. झाडी ता. अमळनेर हा कामावर असतांना त्याठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. अमळनेर हे दुचाकीने आले व बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावर ऑपरेटर पंकज वानखेडे यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करून पंपावरील स्टीलचे राऊंडे ऑपरेटर पंकजच्या डोक्यात मारले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पंकज वानखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अनिल भुसारे करीत आहे.