Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही” – मोहन भागवत

by Divya Jalgaon Team
February 7, 2022
in राष्ट्रीय
0
news

नागपूर, वृत्तसंस्था । धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यांवर असहमती व्यक्त केली असून हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मसंसदेतून आलेल्या गोष्टी हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्येला अनुसरुन नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

नागपुरातील एका वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता’ या व्याख्यानाला संबोधित करत असताना मोहन भागवतांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी धर्मसंसदेत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर करत सांगितले की, “धर्मसंसदेच्या कार्यक्रमातून जे काही समोर येत आहे ते हिंदू शब्द, हिंदू कर्म किंवा हिंदू मन नाही”.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात हरिद्वार येथे पार पडलेल्या धर्मसंसेदत मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह विधाने कऱण्यात आली तर दुसरीकडे रायपूर येथे पार पडलेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मोहन भागवत यांनी संघ आणि हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले आहे.

“वीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संगठित करणे याबद्दल सांगितले होते, परंतु त्यांनी हे भगवतगीतेचा संदर्भ घेऊन सांगितले होते. कोणाचाही नाश किंवा हानी करण्याच्या उद्देशाने नाही,” असेही सरसंघचालक म्हणाले. समतोल, विवेक, सर्वांप्रती आत्मियता हेच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर?

भारत हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, “हे हिंदू राष्ट्र बनवण्यासंबंधी नाही. कोणी स्वीकार करो अथवा नाही, पण हे तेच (हिंदू राष्ट्र)आहे. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे. देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे”.

“संघाचा विश्वास लोकांमध्ये फूट पाडणं नसून त्यांच्यातील मतभेद दूर करणं आहे. यातून निर्माण होणारी एकता मजबूत असेल. हिंदुत्वाच्या माध्यमातून आम्हाला हे कार्य करायचं आहे,” असे सरसंघचालकांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, “वीर सावरकरांनीही हिंदू समाज एकजूट आणि संगठित झाल्यास तो कोणाचा विनाश किंवा नुकसान कऱण्यासंबंधी न बोलतांना भगवदगीतासंबंधी बोलेल असे म्हटले होते”.

Share post
Previous Post

चोपडा – शिरपूर रस्त्यावर दुचाकींचा धडकेत ४८ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला म्हटले बिनबुडाचे राजकारणी – संजय राऊत

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला म्हटले बिनबुडाचे राजकारणी – संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला म्हटले बिनबुडाचे राजकारणी - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group