मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली “शरद युवा संवाद २०२२” यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज कुऱ्हा काकोडा येथे संवाद सभा पार पडली सभा पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,चिटणीस संदिप पाटील, ललित बागुल,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, प स सभापती विकास पाटील, वक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले,युवक उपाध्यक्ष पवन पाटील,जि प सदस्य निलेश पाटील, माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, राजु मा#Raळी, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे ,मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, सरपंच सुनीता ताई मानकर,डॉ बि सी महाजन, रणजित गोयनका, पुंडलिक कपले, ओमप्रकाश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पिंप्राळा,उमरा, थेरोळा, धामणगाव व परिसरातील सुमारे २५० शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राजेश ढोले इच्छापूर यांची मुक्ताईनगर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे लोक खूप आहेत पवार साहेबांनी नेहमी तळागाळातील जनतेवर प्रेम केले. या जनतेला डोळ्या समोर ठेवून त्यांनी विविध योजना सुरू केल्या. १९९० मध्ये शरद पवारांनी फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा यशस्वी कार्यक्रम केंद्र सरकारनेही स्वीकारला. महाराष्ट्रासाठी ३ वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाला. नाथाभाऊ रोहिणी ताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर जळगाव जिल्हयात राष्ट्रवादी ची ताकद वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते दिसून येईल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांनी गोरगरीब जनतेची कामे करून त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात व संघटन मजबूत करावे असे त्यांनी आवाहन केले
यावेळी बोलतांना ॲड.रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी खास युवा कार्यकर्त्यांसाठी या कार्यक्रमाची आखणी केली आहे. शरद युवा संवाद… म्हणजे युवकांशी संवाद… माझ्या युवा मित्रांना मी सांगेन राजकारणात मेहनत घेतली तरच यश मिळते. आपल्या समोर पवार साहेबांचेओठे उदाहरण आहे. त्यांनी शाळेत असताना १९५६ मध्ये गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठींबा देण्यासाठी सर्वात अगोदर शालेय विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला तो त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा होता.