जळगाव, प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे रविवारी सायंकाळी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांना मेणबत्ती लावून तसेच पुष्प अर्पण करून जळगावकर नागरिकांनी आदरांजली वाहिली.
यावेळी मनजीत जांगीड, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, सागर सोनवणे, शशी महानोर, गायक नयन मोरे, संगीतकार नवल जाधव, प्रा.संजय पत्की, गिरीश कुलकर्णी, मंगला बारी, शरद भालेराव, मिलिंद थत्ते, महेश चिरमाडे, दर्शन पारीख, अविनाश मोघे, प्रकाश जैन, फारूक शेख, अर्जुन भारुडे, एम.पी.पाटील, मोहन गांधी, सागर बागुल, राजू पाटील, प्रीतम शिंदे, मयूर जाधव, भटू अग्रवाल, राम मोरे, आकाश येवले, अक्षय जैन, संदीप सूर्यवंशी, प्रशांत वाणी, जड्डू पाटील, लक्ष्मण पाटील, भालोजीराव पाटील, प्रसाद जैन, अश्फाक शेख, भवानी अग्रवाल, नवल गोपाळ, आदी उपस्थित होते.
युवाशक्ती फाऊंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच शहरात कोविदचे नियम बघता लता दीदींच्या स्मृतीत त्यांच्या लोकप्रिय गीतांची मैफिल आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया यांनी दिली आहे.