जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातील वृद्धाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण गिरधर धांडे (वय ७४ वर्ष रा. संचित रणछोड नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या जवळ थांबला. त्यानंतर त्यांच्या हातातील “सोन्याची अंगठी ही खूप सुंदर आहे, मला पण अशी बनवायची आहे”, असे सांगून हात चालाखीने अरुण पांडे यांच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून नेऊन प्रसार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अरुण धांडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीधारकावर एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना किशोर पाटील करीत आहे.