मुंबई : बँडमिंटनसारख्या खेळात आपलं वर्चस्व सिद्ध करत नव्या पिढीसाठी आदर्शस्थानी असणारी एक खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. सायनानं या खेळात आपलं नाव उंचावर मिळवलेलं स्थान पाहताना अनेकांनाच तिचा हेवा वाटतो. अशी ही बॅडमिंटन स्टार सध्या तिच्याप्रमाणं अगदी हुबेहूब दिसणाऱ्या अभिनेत्रीला पाहून थक्कच झाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द सायनानंच या अभिनेत्रीचा फोटो प्रसिद्ध करत ही पाहा, अगदी माझ्यासारखीच दिसतेय हे कॅप्शन लिहिलं.
सायनानं पोस्ट केलेला हा फोटो पाहिला असता ती अभिनेत्री परिणीची चोप्रा असल्याचं लक्षात येत आहे. ‘सायना’ या आगामी चित्रपटात परिणीती या बॅडमिंटन खेळाडूची व्यक्तीरेखा साकारत आहे. ज्यासाठी ती फार मेहनत घेतना दिसली होती. चित्रपटातील तिचा हा लूक म्हणजे या मेहनतीचीच एक झलक असं म्हणायला हरकत नाही.
काही दिवसांपूर्वीच अशी माहिती समोर आली होती, की परिणीती चोप्रा नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच प्रशिक्षणासाठी पुढील १५ दिवस व्यतीत करणार आहे. सायनाच्या जीवनावर आधारित चित्रपसाठी सर्वप्रथन बॅडमिंटन खेळण्याची संधी सुधारणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं ती म्हणाली होती. तेव्हा आता तिच्या या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांनाही कमालीची उत्सुकता लागली आहे.