जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेकडे मनपाची लिंकिंग शेअर्स अंदाजे रक्कम एक कोटी रुपये आहेत. बँक तोट्यात असल्याचे कारण देत जिल्हा बँकेने ही रक्कम मनपाला देण्यास नकार दिले असल्याने स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत.
महापालिकेवर देखील बँकेचे कर्ज होते, त्यावेळी बँकेने एक रक्कम बाबत महापालिकेला ज्या प्रकारे सहकार्य करणे अपेक्षित होते. त्या प्रकारे कोणतेही सहकार्य केले नव्हते. त्यावेळी तत्कालीन सरकारने महानगरपालिका आर्थिक अडचणीत होती. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून मा. आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात हुडकोच्या कर्जाच्या संदर्भात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आपण संचालक असून त्या ठिकाणी आपल्याच महा विकास आघाडीची सत्ता आपल्याला हातात आहे. चेअरमनसह संपूर्ण सत्ता आपल्या हातात आहे. चेअरमन मा. गुलाबराव देवकर व्हाईस चेअरमन शामभाऊ सोनवणे जळगाव शहरातील नागरिक असून या महापालिकेचे नगरसेवक राहून चुकले आहेत. त्यांना महापालिकेचा आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीतर्फे जिल्हा बँक ही ‘अ’ वर्गात आली असून बँकेच्या संचित तोटा कमी होऊन, बँक नफ्यात आली आहे असे मतदारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे बँकेची परिस्थितीत सुधारणा झाली असल्याने बँकेने लिंकिंग शेअर्स ची रक्कम परत करण्यात काही हरकत नाही.
आपण बँकेच्या संचालक असून जळगाव महापालिकेच्या महापौर आहेत. आपण संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील ठराव मांडल्यास तो निश्चित मंजूर होऊन मनपाला न्यायालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आजपर्यंत शेकडो दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे या दाव्यामुळे मनपाला पुन्हा आर्थिक झळ सोसावी लागते. म.न.पा कडे असलेले अपूर्ण कर्मचारी, मनुष्यबळ व त्यात वारंवार न्यायालयीन चकरा त्यामुळे त्यांचा मनपा कामकाजावर परिणाम होत असतो.
या संदर्भातील ठराव आपण बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करून सदर रक्कम मनपाला परत मिळवून द्यावी. जेणेकरून त्या रकमेचा शहराच्या विकासासाठी उपयोग होईल अशी मागणी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे करण्यात आली आह्रे. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, म.न.पा.गटनेते भगत बालानी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नगरसेवक धिरज सोनवणे, जितेंद्र मराठे, भरत सपकाळे, किशोर चौधरी, महेश चौधरी, ललित खडके, शोभा दिनकर बारी आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.