नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता मिळू शकतो.
निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सन 2001 नुसार, डिसेंबर 2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो शकतो.
सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3 टक्के अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता एकूण महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे.