Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. पाटील रूग्णालयात उपचार

by Divya Jalgaon Team
February 3, 2022
in जळगाव
0
आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. पाटील रूग्णालयात उपचार

जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्‍या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्‍या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्‍या, कुणाशीही न बोलणार्‍या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्‍याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला. कडक ऊन असो वा पाऊस असो वा सद्यस्थीतीला पडणारी कडाक्याची थंडी, या सर्वांमध्ये तो एका कोपर्‍यात बसून राही. कधीतरी सिगारेटचा झुरकाही तो मारत असे. स्वभावाने अत्यंत हळवे असणार्‍या डॉ.उल्हास पाटील यांच्या मनात त्या तरुणाविषयी आस्था निर्माण झाली.

एके दिवशी रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांशी त्यांनी या तरूणाच्या अवस्थेबाबत चर्चा केली. मग काय हा तरूण मानसोपचार विभागाकरीता आव्हान ठरला असून त्याच्यावर उपचार करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून तरूणावर आपण उपचार करू शकतो का? होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तरूण उपचारास तयार होईल का? किंवा पळून जाईल का? या अनेक शक्यता पडताळून पाहत आज प्रवेशद्वारा बाहेेर जावून त्या तरूणाला उपचारासाठी तयार करण्यात मानसोपचार तज्ञांनी यश मिळवले आहे.
दरम्यानच्या काळात ना आंघोळ ना दाढी, डोईवरचे केस वाढलेले, अंगात मळकट कपडे असलेल्या या तरूणाची सर्वप्रथम दाढी, कटिंग करण्यात आली. या नंतर स्वच्छ कपडे देण्यात आले. वार्डात नेवून त्याची आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले आहे. या तरूणावर उपचार देखिल सुरु झाले असून सकारात्मक प्रतिसाद देखिल मिळत आहे.

वाट चुकलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणणार – माजी खा. डॉ. उल्हास पाटील
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्यसनामूळे वाट चुकलेल्या देशाचे भवितव्य असलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानसोपचार विभाग करणार असून जास्तीत जास्त तरूणांनी उपचार करून घ्यावे असे आवाहन केले आहे.

Share post
Previous Post

आता घर खरेदी करणाऱ्यांचे खिसे मोकळे होणार

Next Post

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३४ टक्क्यानी वाढ निश्चित

Next Post
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३४  टक्क्यानी वाढ निश्चित

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३४ टक्क्यानी वाढ निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group