भुसावळ प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पाचव्या आणि सहाव्या लाइनच्या कामासाठी मुंबई विभागातील ठाणे-दिवा दरम्यान रेल्वे प्रशासनाने शनिवार, रविवारी (५, ६ फेब्रुवारी) ब्लाॅक घेतला आहे. यामुळे अप-डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द झाल्या असून त्यात अमरावती-मुंबई, सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.
ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाइनचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामासाठी प्रशासनाने येत्या शनिवारी व रविवारी ब्लाॅक घेतला अाहे. ब्लाॅकच्या काळात अप-डाऊन मार्गावरील दहा गाड्या रद्द झाल्या आहेत. तसेच जालना-मुंबई, मुंबई-मनमाड, मनमाड-मुंबई एक्स्प्रेस या दाेन गाड्या सुद्धा दोन दिवस धावणार नाही. १२११२ व १२१११ अमरावती-मुंबई ही गाडी शुक्रवारी व शनिवारी रद्द आहे. गाडी क्रमांक १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ४ व ५ फेब्रुवारी, नागपूर-मुंबई सेवा-ग्राम एक्स्प्रेस शुक्रवारी (दि.४) व शनिवारी (दि.५), मुंबई-नागपूर सेवा-ग्राम एक्स्प्रेस ५ व ६ फेब्रुवारी, नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस ४ व ५ फेब्रुवारी, मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस ५ व ६ फेब्रुवारीला रद्द असेल. दहा गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल होणार असले तरी आरक्षित तिकिटांचे पूर्ण पैसै परत मिळणार आहेत.