मेष:- आपलं व्यवसाय चांगला पद्धतीने सांभाळा त्यामुळेच तुम्हाला लाभ होईल. आपली ओळख वाढतील. तुमच्या साथीची उत्तम साथ मिळेल. तसेच कुठं ही जातांना काळजी घेत राहा.
वृषभ:- महिला तुम्हाला तुमच्या कामात साथ देणार. मागील बाकी असलेले पैसेची आवक होणार.
मिथुन:- सोन्याची दागिने खरेदी कराल. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाप्रमाणे खरेदी कराल.
कर्क:- मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल.
सिंह:- जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.
कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला.
तूळ:- हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.
वृश्चिक:- बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.
धनू:- स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल.
मकर:- सामुदायिक वादात अडकू नका. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात.
कुंभ:- कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका.
मीन:- काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.