चोपडा- चोपडा तालुका तहसीलदार छगन वाघ यांना लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन फारकासह दिवाळीपूर्वी अदा करा, अशी मागणी केली आहे.
सदर मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या दिवाळीला तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा तीव्र इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.
अमृतराव महाजन, शांताराम पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी शशिकला निंबाळकर, सरला देशमुख, रेखाबाई साळुंखे, नजमा बी शेख गफार, सुमनबाई माळी, नंदाबाई चौधरी, इंदुबाई चौधरी, लक्ष माळी, उषा भराडी, मीराबाई पारधे, वत्सला चौधरी, मीना साळुंखे, शीला बाविस्कर आदी उपस्थित होते.