जळगाव प्रतिनिधी । भाजपने मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्या ठाकूर यांचा राजीनामा घेण्याआधी भाजपने घरकूल प्रकरणात शिक्षा झालेल्या आपल्या महापालिकेतील पाच नगरसेवकांचे आधी राजीनामे घ्यावेत असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिला आहे.
भाजपकडून महाविकास आघाडीतील बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना शिक्षा झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु भाजपच्या जळगाव महापालिकेतील पाच नगरसेवकांना घरकुल प्रकरणी शिक्षा झाली आहे.
भाजपने आधी आपल्या नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत त्यानंतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असे आव्हान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिले आहे. जळगावातील भाजपच्या पाच नगरसेवकांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याचे सांगत शिक्षेनंतर अजूनही नगरसेवकांनी राजीनामा दिलेला नाही. नैतिकदृष्ट्या पक्षाच्यानेसुद्धा त्यांचे राजीनाम्ये घेतले नाही. त्यामुळे भाजपने आधी या नगरसेवकांचा राजीनामा घ्यावा असा सल्ला सुनील महाजन यांनी दिला आहे.