जळगाव प्रतिनिधी – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप महानगराच्या वतीने आठ दिवसांत दुसऱ्यांदा पटाेले यांचा निषेध करत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष पटाेले यांनी माेदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. त्यानंतर आणखी एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. साेमवारी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आदाेलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे, उपाध्यक्ष अमित भाटिया, महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, सना खान, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, ग्रामीणचे अरुण सपकाळे, गोपाल भंगाळे, राजू सोनवणे, जहांगीर खान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नाना पटाेले यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले.